म्हसवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


म्हसवड : म्हसवड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पहाटे ५ वाजता श्री सिध्दनाथ मंदिरात आकाशबाबा राजेमाने यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला, तसेच सकाळी ९ वाजता शांतिदुत गौतम बुद्ध , बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आकाशबाबा व तुषार माने यांनी पुष्पहार अर्पण केले, नंतर महात्मा फुले चौकात सुरेश गोंजारी व आकाशबाबा राजेमाने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली, यावेळेस म्हसवड नगर पालिकेचे नगराध्यक्ष तुषार विरकर , उपनगराध्यक्ष सौ स्नेहल सुर्यनवशी, गटनेते धनाजी माने, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, युवराज सुर्यनवशी, उपस्थित होते, आकाशबाबा यांनी आपल्या भाषणात संभाजी राजेच स्मारकासाठी नगरपालिकेच्या सत्ताधारी व विरोधी पक्ष याना सर्व शिवभक्तांच्या तर्फे मागणी बोलून दाखवली, सरबत वाटप ही करण्यात आले, यासाठी नामदेव माने, आशिष भागवत, अमोल राऊत, सुरज जगताप, सिद्धेश्वर काटे, आकाशबाबा राजेमाने, सुरेश गोंजारी,अजय माने डॉ सौरभ सावंत, आरिफ मुलांनी, योगेश माने, सुरज तावसे , सागर सारतापे, यासह सर्व गावातील शिवभक्त उपस्थित होते,

No comments

Powered by Blogger.