दि. २२ ते दि. २६ मे रोजी दुधेबावी फेस्टीव्हल


दुधेबावी : येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे दुधेबावी फेस्टिव्हलचे आयोजन मंगळवार दि.२२ मे ते शनिवार दि.२६ मे दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता सलग १८ व्या वर्षी आयोजन केले असून त्यामध्ये संत गाडगेबाबा व्याख्यानमालेतर्गत विविध मान्यवरांची व्याख्याने होणार असंल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.

व्याख्यानमालेचे उद्घाटन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे परिविक्षाधिन पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी न्या. श्रीधर ढेकळे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून राज्य उत्पादन शुल्क सातारच्या अधिक्षक स्नेहलता श्रीकर नरवणे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, प्रा. शिक्षक बँकेचे चेअरमन बलवंत पाटील, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रविंद्र बेडकिहाळ, निवृत्त अधिक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनवलकर, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे उपस्थित राहणार आंहेत. दि. २२ मे रोजी बारामतीचे प्रा. रविंद्र कोकरे यांचे कथाकथन होणार असून अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित राहणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, उपसरपंच भाऊसाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत. दि. २३ मे रोजी जेष्ठ विचारवंत अभय भंडारी यांचे स्वातंत्र्याला अर्थच काय या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटण शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार व्यंकटेश देशपांडे, संपतराव सोनवलकर सर उपस्थित राहणार आहेत. दि. २४ मे रोजी सांगलीच्या कवयित्री लता ऐवळे - कदम यांचे बंध नात्यांचे, रंग कवितेचे या विषयावर व्याख्यान असून अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यशवंत खलाटे- पाटील, एम.एस.ई.बी. वर्कस फेडरेशनचे झोनल सचिव नानासाहेब सोनवलकर उपस्थित राहणार आहेत. दि. २५ मे रोजी पुण्याचे सचिन पवार हे संतांचे सामाजिक योगदान या विषयावर बोलणार असून अध्यक्षस्थानी सातारा विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुभाष भांबुरे, सुदाम वावरे, अहिल्या सोनवलकर उपस्थित राहणार आहेत. दि. २६ मे रोजी नवनाथ कोलवडकर यांचे सुंदर जगण्यासाठी या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी गृह विभागाचे कक्ष अधिकारी धीरज अभंग आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नसीर शिकलगार, भानुदास सोनवलकर सर, वनपरिमंडल अधिकारी चंद्रकांत गेजगे उपस्थित राहणार आहेत. या ज्ञानयज्ञ शृंखलेला उपस्थित रहावे असे आवाहन व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ.सागर कराडे ,सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, शेखर चांगण, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ.युवराज एकळ यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.