Your Own Digital Platform

सातारा जिल्ह्यासाठी वादळाची चेतावणी


स्थैर्य, फलटण : पुढील 4 तासामध्ये सातारा जिल्ह्यात वादळ येण्याची चेतावणी हवामान खात्याकडून आली असल्याचे फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी नुकतीच दिली आहे.

नुकत्याच झालेल्या वादळाप्रमाणे आजही अजून एकादे वादळ येऊ शकते अशी श्यकता हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्यातील सर्व विभागांना कळवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.

तरी फलटण शहरासह तालुक्यातील जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशाशनामार्फत करण्यात आले आहे.