आम्‍ही सातार्‍याबाहेर असलो की अनेकांच्या कॉलर उडतात : रामराजे


सातारा :सातार्‍यातून लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी दिली हे आम्ही खासदार शरद पवार साहेबांना विचारू शकतो. खासदार पवार यांच्याकडे चर्चा करण्यासाठी त्यांच्याप्रमाणे आम्हालाही दिल्लीला जाता येते. लोकसभेच्या उमेदवाराबाबत पवार साहेबांनी काही निर्णय घेतला असल्यास त्यांच्याशी चर्चा करू. आम्ही दुसरे कोणाला नाही केवळ पवार साहेबांशी बांधिल आहोत, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.

सोमवारी जिल्हा बँकेची सभा झाल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, उपाध्यक्ष सुनील माने व संचालक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी कोणी किती विरोध केला तरी माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल आहे.

गल्लीतील गोंधळापेक्षा मी दिल्लीतील निर्णयाला महत्त्‍व देतो,' या उदयनराजेंच्या वक्त्याव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय स्वतः पवार साहेब घेतील. त्यांच्या विचाराशी आम्ही बांधील आहोत. कर्नाटक राज्यातील निकालानंतर शरद पवार साहेब राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतील. जर सातार्‍याच्या बाबती त्यांनी काही निर्णय घेतला असल्यास आम्ही त्यांच्याशी चर्चा करू व योग्यवेळी भूमिका स्पष्ट करू. खा. पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हाला ही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे विधान करत उदयनराजेंचे नाव न घेता टीका केली.

No comments

Powered by Blogger.