लातूर विधानपरिषद : कराडांच्या माघारावर पवारांचा गौप्यस्फोट


सातारा :विधानपरिषदेच्या लातूर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपमधून आलेले व राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केलेले राजेंद्र कराड यांनी अचानकपणे माघार घेतली आहे. या संदर्भात सातार्‍यातील पत्रकार परिषदेत खासदार शरद पवारांनी गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आर्थिक ताकद नसल्यामुळे माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही घडामोड म्हणजे धनंजय मुंडेंना धक्काबिक्का काही नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

परभणी, अमरावती या मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवार पळवापळवीचे प्रकार घडत आहेत याबाबत विचारले असता, खासदार शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी कुणाबद्दलही हट्ट धरला नाही. आम्ही असा विचार केला की परभणी ही एकच जागा आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड ही तीन जिल्ह्यांची जागा होती. या निवडणुकीत तीन जिल्ह्यात आपल्याला पक्षाचे काम वाढवता येईल. त्यामुळे या जिल्ह्यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.

मुंडे यांना आम्ही समजून सांगितले. याठिकाणी घेतलेला योग्य निर्णय आहे. त्यामुळे धनंजयला धक्का वगैरे काही नाही, तसे म्हणणे धनंजयवर अन्याय ठरेल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवाराने माझी आर्थिक ताकद नाही मी निवडणूक लढू शकत नाही असे शरद पवारांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.