वावरहिरे येथे सत्यशोधक विवाह संपन्न


म्हसवड :    वावारहिरे ता.माण येथे बहुउदेशीय सत्यशोधक केंद्र वावरहिरे व पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन व सोशल फौडेंशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांच्या पुढाकाराने सत्यशोधक पध्दतीने दोन विवाह संपन्न झाला  चि. गणेश जालिंदर कापसे आणि चि. सौ.ज्योती नामदेव शिंदे यांचा दि.६ मे रोजी तर व चि.मंगेश आनंदराव गोरे रा. डंगिरेवाडी व चि. सौ.का. प्रियांका बापूराव कापसे रा. वावरहिरे यांचा दि ११ मे रोजी महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक  पद्धतीने विवाह करण्यात आला. पहिला विवाह ६ तारखेला तर ११ तारखेला दुसर्या जोडप्याचा विवाह  संपन्न झाला.महात्मा फुले यांचे वेशभूषेत रघुनाथ ढोक , यांनी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे विवाह लाऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी कापसे व ढोक आणि कापसे व गोरे  यांनी सर्वांना विविध प्रकारची ३०० झाडे आणि मुलींना व महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच दीनांची साउली हे दोन १९१ जणांना ग्रंथ महात्मा फुले जयंती निमित्त  वाटप केले.

जुन्या रुढी ला फाटा देत या नवदापत्यांनी समाजाला जाणीव करुन दिली या पुढे ही असे विवाह झाल्यास सलोखा निर्माण होईल आशी भावना लोकांनी व्यक्त केली.
     
 विवाहाची हळद लागण्यापूर्वी वावरहिरे येथे श्री पाणलिंग पठारावर पाणी फौंडेशन साठी वधुवर आणि त्यांचे दोन्हीकडील 220 वर्हाडी मंडळीने श्रमदान करून आपल्या माण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी सामाजिक जाणवितेतून काम केल्याने ग्रामस्थांनी व आमदार जयकुमार गोरे  सरपंच चंद्रकांत वाघ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई , दहिवडीचे नगरसेवक सतीश जाधव , रघुनाथ ढोक यांनी त्यांचे कौतुक केले. पाणी फौंडेशन कोअर टीम आणि हजारोचे  संख्येने जनसमुदाय यावेळी  उपस्थितीत होता.

No comments

Powered by Blogger.