पसरणी घाटात महिलेचा घातपात?


वाई : वाई- पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ खोल दरीत अंदाजे ३५ वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. वाई पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह बाहेर काढला. हा खून आहे की आणखी काही याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण समजू शकणार आहे.

No comments

Powered by Blogger.