मुंजवडी सोसायटीच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या वाटर कुलरचे उदघाटन


राजुरी : मुंजवडी ता. फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने शुध्द व थंड पिण्याच्या पाण्याचे वाटर कुलरचे उदघाटन करण्यात आले आहे.

या वाटर कुलरचे उदघाटन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना सदस्य विश्वासदादा गावडे, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, श्रीरामसहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर माळवे, संतोष खटके, सहायक निबंधक बाळासाहेब पाटील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सोमनाथ गावडे, राजुरी सोसायटीचे मा चेअरमन सचिन आबासाहेब पवार, कांतीलाल खुरंगे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन भास्करराव घोलप, शिवाजी लंगुटे, पवारवाडीचे सरपंच अनिल जाधव, हनुमंतवाडीचे सरपंच विक्रमसिंह जाधव, उपसरपंच बाळासाहेब कदम, राजुरी गावचे उपसरपंच पै. भारत गावडे,राजाळे चे सरपंच संभाजी निंबाळकर, बाळासाहेब गौड, मुंजवडीचे सरपंचदादा कदम उपसरपंच सौ. उज्वला झेंडे व सर्व ग्रामपंचायतसदस्य, सोसायटीचे चेअरमन उत्तमराव माळवे, व्हा. चेअरमन विठ्ठल रणदिवे व सर्व संचालक, बाळासाहेब निंबाळकर, कमलाकर ठणके, रमेश पवार, कि.मा. शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय घाडगे, मा. उपसरपंच शंकरराव घाडगे, हनुमंत जाधव, संपतराव ठणके, मा. चेअरमन बाळासाहेब ठणके, रामभाऊ येडे, दादासो ठणके, राजाराम साळुंखे, रमेश ठणके, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन वाघमोडे, दिलीप ठणके, श्रीकांत कदम, कुंडलिक कदम, वसंत रणदिवे, मा. सरपंच एल. डी. रणदिवे, शंकर कदम, दत्तात्रय रणदिवे, उत्तमराव वाघमोडे, आप्पासाहेब वाघमोडे, साताराजिल्हा बॅंकेचे निंबाळकर, विकास अधिकारी बरकडे , गंगाराम लंगुटे, बाळासो फरांदे, शिवाजी जाधव, माणिकराव जाधव, मा. उपसरपंच लक्ष्मण रणदिवे, तानाजी रणदिवे, सुभाष झेंडे, किसनराव ठणके आदींसह मुंजवडी गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फलटण तालुक्यात सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्व प्रथम मुंजवडी सोसायटीने सुरू केलेला वाटर कुलरचा उपक्रम निश्‍चित कौतुकास्पद आहे. सहकारी संस्था जिवंत ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सांगितले.
या मुंजवडी सोसायटीच्या वतीने एक रूपये प्रति लिटर पाणी दिले जात आहे. या प्रकल्पास विविध सोसायटीचे शिष्टमंडळे भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे सचिव अशोक घाडगे यांनी केले. तर आभार चेअरमन उत्तमराव माळवे यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.