कुडाळमध्ये अडीच लाखाची अवैध दारू पकडली


कुडाळ : कुडाळ येथील दारू विक्रेता दीपक शामराव वारागडे व जाधव या दोघांना शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दारूचे देशी विदेशी असे १७ बॉक्स व दारू वाहतूक करणारी जीप असा एकूण २ लाख ५० हजार रुपयाच्या मुद्देमालासह दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणात ज्या दुकानातून माल खरेदी करण्यात आला त्या विशाल वाईन्स या दारू दुकान व मालकावरही कारवाई करण्यात आली आहे.

कुडाळ येथील अबोली धब्याचा मालक दीपक शामराव वारागडे यांच्याकडे जीप मधून दारू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वारागडे याच्या घराजवळ सापळा रचला.

शुक्रवारी सकाळी ७ वाजता दारूने भरलेली एक पीक अप घरा समोर येताच सपोनि जीवन माने यांनी पिकअपची झडती घेतली असता त्यामध्ये १७ दारूचे बॉक्स आढळले.

No comments

Powered by Blogger.