आदरकी न्यू इंग्लिश स्कूलच्या संगणक विभागाला शॉटसर्किटने आग ; लाखोंचे नुकसान


फलटण: आदरकी बुद्रुक ता फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शनिवारी सकाळी 10 वाजता अचानकपणे शॉटसर्किटने आग लागली अन काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. अन ग्रामस्थांची एकच पळापळ सुरू झाली. दरम्यान, या आगीत एक लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, आदरकीच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे पहाटेपासून शॉर्टसर्किट झाले असल्याचं प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान या इमारतीमधून धुरांचे मोठया प्रमाणात लोट सुरू झाले अन ग्रामस्थांची आग विझविण्यासाठी एकच पळापळ सुरू झाली. पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.अखेर शरयू साखर कारखान्याचा अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या आगीमध्ये 12 संगणक, खुर्च्या, फर्निचर, आदींचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

उन्हाळी सुट्टी शाळेला असली तरी या शाळेच्या देखभालीसाठी शिपाई असतोच पण त्यांना या घटनेची कल्पना कशी आली नाही अशी एकच उपस्थितांमध्ये चर्चा होती.

No comments

Powered by Blogger.