मुख्याध्यापकला भाजप, शिवसेना पदाधिकऱ्यासह चौघांकडून मारहाण, खंडणीची मागणी


सातारा : सातारा शासकीय विश्रामगृह येथे अमोल एकनाथ कोळेकर (रा. कोंडवे) यांना रूम नंबर ९ मध्ये डांबून मारहाण करत ५ लाखाच्या खंडणीची मागणी झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी भाजपचे सुनील कोळेकर व शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांच्यासह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घटनेमुळे साताऱ्यात चर्चेला उधाण आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित चौघांनी दि. १६ रोजी सर्किट हाऊस येथील ९ नंबरच्या खोलीमध्ये तक्रारदार अमोल कोळेकर यांना कोंडले. चप्पलने मारहाण करत एक प्रकरण मिटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास रिव्हॉल्वर , तलवार असल्याचे सांगून खून करण्याची धमकीही दिली.

ही सर्व घटना दुपारी १ ते ४ या कालावधीत सर्किट हाऊस येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, भाजप- सेना पदाधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकला थेट मारहाण करत खंडणीची मागणी झाल्याने सातारामध्ये खळबळ उडाली आहे.

No comments

Powered by Blogger.