मराठा नागरिक पतसंस्थेचा लोणंदला रौप्य महोत्सव


लोणंद : लोणंद ( ता. खंडाळा ) नगरपंचायतीच्या पटांगणावर रविवार दिनांक १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई खंडाळा तालुक्याचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील, फलटण कोरेगाव तालुक्याचे जननायक आमदार दीपक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

यावेळी संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीमध्ये सहकार्य करणारे, सभासद, ठेवीदार, कर्जदार व पिग्मी एजंट यांचा सत्कार तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करणेत येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिलराजे निंबाळकर व ऊपाध्यक्ष, हणमंतराव यादव यांनी दिली आहे .सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, तज्ञ संचालक डॉ. गणेश दाणी, गिरीष रावळ, । संचालक संजय मोकाशी, विजयकुमार जाधव, चंद्रकांत जगताप ,महेंद्र  यादव, किशोर शिंदे ,राजेंद्र शिंदे, मंदाकिनी शिंदे, सुरेखा भोईटे, डॉक्टर दयाराम सूर्यवंशी, सचिन शहा संस्थेच्या सचिव, सौ.मनिषा भोसले, सहसचिव विजयश्री माळवदकर यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.