माझ्या मंत्रिपदावर अनेकांचा डोळा : आठवले


कराड :  माझ्या मंत्रीपदावर अनेकजणांचा डोळा आहे. मी मंत्री झालो म्हणून काही जणांच्या पोटात गोळा आला आहे. सरकारमध्ये असल्याने काही लोक माझ्याकडे वाकड्या नजरेने बघतात, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. बाबासाहेबांचे संविधान बदलू देणार नाही. कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सोडणार नाही, असा इशाकराड येथे आरपीआयच्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहाजी कांबळे, संगीताताई आठवले, अशोकराव गायकवाड, विवेक कांबळे, किशोर तपासे, युवराज काटरे आदी प्रमुख उपस्थित होते.

आठवले म्हणाले, दलित समाजामध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच बाबासाहेबांचा जय भीम बुलंद करण्यासाठी व दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळ कार्यरत आहे. अन्याय होणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम ही चळवळ करीत असते. सर्वांबरोबर दोस्ती करणारी ही चळवळ आहे.

अत्याचार करणारे काही मुठभर लोक असतात. म्हणून सर्व समाजाला त्याच रांगेत बसविणे योग्य नाही. काही वाद असतील परंतु प्रत्येक गावातील व्यक्‍ती एकमेकांवर अवलंबून असते. याचा विचार करून नेहमीच वाद करत बसू नये. मात्र अन्याय झालाच तर तो आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र बंदवेळी मराठा समाजाने कोठेही विरोध केला नाही. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. सर्वच मराठा समाजाला दोष देता येणार नाही. शिवरायांच्या विचाराने चालणारे खरे मराठे आमच्याबरोबर आहेत. खोटे मराठे त्यांच्यासोबत आहेत.

दलितांच्या आरक्षणाला ध्नका लागू देणार नाही. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची ताकद कोणातही नाही आणि जर कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्यांना आम्ही धडा शिकवू. बाबासाहेबांनी संविधन लिहिले नसते तर देशाचे तुकडे झाले असते. आमचे तुकडे झाले तरी चालतील. पण आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नाही.

अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर करू नये. विनाकारण लोकांना त्रास होईल असे कृत्य करू नये. मात्र ज्या ठिकाणी अन्याय होईल तेथे अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. आम्ही संभाजी भिडेंच्या बाजुचे नसून त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही आरपीआयने केली होती, असेही ना. आठवले यांनी सांगितले. यावेळी शहाजी कांबळे व अशोकराव गायकवाड यांनी मनोगत व्य्नत केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे येथे २७ मे रोजी महाअधिवेशन होणार आहे. या भव्य-दिव्य अशा अधिवेशनासाठी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये आरपीआयची ताकद लोकांना कळणार आहे. आमच्या बरोबर मोठ्या संख्येने समाज असल्याचे यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही ना. रामदास आठवले यांनी केले.रा दिला.

No comments

Powered by Blogger.