धोम बलकवडीच्या कॅनॉलमधून एक पोटफाटा काढून देण्याची शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी


आरडगाव : वस कोपर्डे, तांबवे तालुका फलटण या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी धोम बलकवडी कॅनॉल मधून एक पोटफाटा कालवा काढुन ते पाणी सरदेच्या ओढयातुन सोडले तर त्याचा भयंकर मोठा फायदा परिसरातील शेतीसाठी होणार आहे. सध्या सूर्य हा आग ओकत असल्याने परीसरातील त्या ठिकाणच्या शेतीला पाणी नसल्यामुळे त्या ठिकाणच्या पिकांची दयनीय अवस्था झालेली आहे. धोम बलकवडीच्या कॅनॉल हा हाकेच्या अंतरावर जात असला तरी त्याचा कोणताही फायदा या भागातील शेतकरयांच्या पिकाला नसल्याने शेतकरी वर्गातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

धोम बलकवडीचे पाणी सरदेच्या ओढ्यातून वस कोपर्डे, तांबवे या ठिकाणी सोडले तर त्याचा निश्चित फायदा या परिसरातील शेतीला होणार आहे सरदेच्या ओढ्यातुन सोडलेल्या पाण्याचा फायदा शेतीला, गुरांच्या पिण्याच्या पाण्याला व विहीरींना होणार असलेने तत्पर पाणी पोट कालवा काढुन त्यातुन पाणी सरदेच्या ओढयात सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन पोटतिडकीने केली जात आहे.

 या ओढ्यातून पाणी सोडले तर ते पाणी तांबवे धरणात येईल व तांबवे धरणात पाणीसाठा झालेले पाणी पोट फाटयाने चांभारवाडी, आरडगाव कापडगांव, तरडगाव, भोरकरवाडी या भागात सोडले तर त्या पाण्याचा निश्चित फायदा भागातील पिण्याच्या पाण्यासाठी गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी होईल व लोकांची होणारी गैरसोय त्यामुळे दूर होईल. सालपे गावातील बिरोबा मंदिरापाठीमागील बाजुस एक पोट फाटा काढुन देण्याची मागणी अनेक वेळा शेतकऱ्यांनी धोमबलकवडीचे इंजिनिअर, पाटकरी, ऊपअभियंता मा. जाधव साहेब, कारखानीस, मोहीले यांचेकडे करुन सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गातुन त्यांचे विषयी पुर्णनाराजी व्यक्त केली जात आहे. सन२०१७ मध्ये तरं भागातील सतरा शेतकऱ्यांनी प्रति १००० रुपये प्रत्येकी काढुन सतरा हजार रुपये खंडाळा येथील थोमबलकवडी ऑफीसमधे नेऊन भरले होते. 

तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही .ऊलट अधिकारी वर्ग यांचेकडुन शेतकऱ्यांना केराची टोपली दाखविण्यात आल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत,धोम बलकवडी कालव्यातून एक पोट फाटा काढून देण्याची मागणी दादा दगडू शिंदे, सतीश सुदाम शिंदे, रत्नशिव बबनराव शिंदे ,बाळासाहेब रघुनाथ मांढरे, बापुराव महादेव शिंदे ,शरद पोपटराव बर्गे, दादासो हनुमंत बर्गे ,मोहन नरसिंह शिंदे, नंदकुमार शिंदे ,गणेश शिंदे ,विजय शिंदे, दिलीप बाबुराव शिंदे, शंकर हिंदूराव शिंदे, संजय दगडू शिंदे आदी लोकांनी आग्रही मागणी केली आहे.

No comments

Powered by Blogger.