माणमध्ये दुष्काळ हटवण्यासाठी गावोगावी पाणी चळवळ सुरु


म्हसवड : कायम दुष्काळी असा माथी असलेला शिक्का पुसुन टाकण्यासाठी माणची संपुर्ण जनता आज एकवटलेली असुन या जनतेने गावोगावी पाणी चळवळ सुरु करुन आपला गाव पाणीदार बनवण्यासाठी हाती टिकाव अन पाटी घेवुन श्रमदान सुरु केले आहे यामुळे आज माण तालुक्यात एक जनशक्ती उभी राहिली असल्याचे चित्र निर्माण झाले असुन ही जनशक्ती माणच्या माथ्यावर असलेला कलंक नक्कीच खोडुन पाणीदार माण अशी नवी ओळख निर्माण करेल असा विश्वास ना. सदाभाऊ खोत यांनी दिवड ता. माण येथे बोलताना व्यक्त केला.

नामदार सदाभाऊ खोत आज माण तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील दिवड या गावात पाणी फौंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या शेततळ्याच्या खोद कामाला भेट देवुन त्याठिकाणी त्यांनी श्रमदानाच्या कामी सहभाग घेतला, यावेळी उपस्थीत श्रमदात्यांना मार्गदर्शन करतात मंत्री खोत बोलत होते, ते बोलताना पुढे म्हणाले की माण तालुक्यात दुष्काळ हा यापुढे पहावयास मिळणार नाही या तालुक्याला वरदान ठरणार्या पाण्याच्या सिंचन योजना पुर्ण करण्यासाठी आमच्या शासनाने भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे त्यामुळे याठिकाणी शाश्वत पाण्याची उपलब्धता होणार आहे, मात्र याठिकाणी पडणार्या पाऊसाचा थेंब ना थेंब हा त्याच गावातील शेतकर्यांच्या शिवारात मुरला पाहिजे हे सुध्दा खुप गरजेचे असल्याने याठिकाणी सुरु असलेली पाणी चळवळ ही येथे खुप महत्वाची असुन यामुळे येथील गावे ही पाणीदार नक्की बनतील यात शंका नाही असेही शेवटी ना. खोत म्हणाले, यावेळी भास्कर नाना कदम (संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष), मा. बाळासाहेब मासाळ (भाजपा तालुका अध्यक्ष, माण), मा. समीर जाधव (युवानेते), मा. विठ्ठल विरकर, मा. रामचंद्र सावंत (सरपंच ग्राम. दिवड), मा. विश्वंभर बाबर, मा. अशोकशेठ सावंत, हणमंत पाटिल सदाशिव सावंत सखाराम भोसले दादासाहेब सावंत ग्रामसेवक विजय काटकर तलाठी ढोले आण्णा सुभाष विरकर आदी उपस्थित होते, यावेळी ना. खोत यांनी दिवड मध्ये तलावाची खुदाई केली त्यांच्यासोबत असलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांनीही यावेळी खोत यांच्यासोबत श्रमदान केले.

No comments

Powered by Blogger.