काळ आला होता पण, वेळ आली नव्हती


लोणंद : अंदोरी येथील बुवा साहेब मंदीर (दगडे वस्ती ) जवळून जाणार्‍या वीर धरणाच्या निरा उजवा कालव्यात मंगळवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू, सुन व नात या तिघीही कालव्यातील पाण्यात पडल्या. यावेळी कालव्यालगत असणार्‍या रस्त्यावरून जात असताना पाडळी येथील युवक कैलास जाधव याने ही घटना पाहिली. त्यानंतर त्याने अन्य वाटसरूंच्या मदतीने या तिघींचा जीव वाचवले. यानंतर त्यांना लोणंद येथील खासगी रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती त्या तिघींना तोंडात पाणी गेल्यामुळे त्यांना लोणंद येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तिघींचा जीव वाचविणार्‍या कैलास जाधव व अन्य वाटसरूंचे नातेवाईक व ग्रामस्थांनी आभार मानले.

तिघींचा प्राण वाचवला हेच समाधान : जाधव

अंदोरीच्या दगडे वस्ती कडे जाताना कॅनॉलच्या पाण्यात पुलाच्या पिलरला धरून तिघी आरडा ओरडा करत होत्या. पाण्यात उडी मारून वाचवण्यास गेल्यास त्यांनी पिलरची पकड सैल होऊन वाहून जाण्याची भीती होती. त्यामुळे कैलास व अन्य वाटसरूंनी साडीचा वापर करत त्याचा दोरसारखा वापर केला. त्यानंतर त्या तिघींनाही हळूहळू धीर देत त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. आम्हाला याचे समाधान लाभले की तिघींचा प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले.आली.

No comments

Powered by Blogger.