लाच स्विकारताना पाटण पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी जाळ्यात


पाटण:- विनयभंगाच्या केस मधून बाहेर काढतो आणि प्रकरण मिटवून टाकतो असे सांगत यासाठी दोन हजार रूपयेची लाच स्विकारताना पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय बाळकृष्ण राक्षे वय- ५३ आणि पोलिस नाईक कुलदिप बबन कोळी वय- ३६ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भरारी पथकाने पाटण पोलीस स्टेशन येथे रंगेहाथ पकडले. या कारवाईने पाटणसह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी सुट्टीनिमित्त लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पाटण येथे नवीन स्टेंड शेजारी आलेल्या यात्रेतील खेळणी पाळणे, रेल्वे, आदी खेळणी मनोरंजनाच्या ठिकाणी शुक्रवार दि. ११/५/२०१८ रोजी येथे काही युवकांचा वाद झाला. या वादानंतर खेळणी मालकांनी या युवकांवर पाटण पोलीस स्टेशनमध्ये ३५४ विनयभंग या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला. व १०७, ११० खाली प्रतिबंधात्मक कारवाई केली. असता सदर गुन्ह्याच्या केस मधून बाहेर काढतो.आणि प्रकरण मिटवून टाकतो. असे सांगत या युवकाकडे १६ हजार रुपये ची लाच मागितली. या पैस्यासाठी पोलिस हवालदार संजय राक्षे, पोलिस नाईक कुलदिप कोळी हे वेळोवेळी या युवकाकडे मोबाईल वरून संपर्क साधून होते. पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करून वरून पैस्याची मागणी करून त्रास देतात. 

या त्रासाला कंटाळून या युवकाने पाटण पोलीस स्टेशनच्या संजय राक्षे, आणि कुलदिप कोळी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारी वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारा पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला यांच्यासह आनंदराव सकपाळ, भरत शिंदे, संभाजी बनसोडे, नितीन राक्षे, संभाजी काटकर यांच्या पथकाने पाटण पोलीस स्टेशनच्या आवारात सापळा रचून पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय बाळकृष्ण राक्षे वय- ५३, बक्कल नं. १२७४, रा. कारवे नाका पोलिस लाईन कराड. आणि पोलिस नाईक कुलदिप बबन कोळी वय - ३६ बक्कल नं. २१९२ रा. खराडे कौलनी कार्वे नाका कराड. यांना दोन हजार रूपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाई वेळी पाटण पोलीस स्टेशनमध्ये एकच सन्नाटा पसरला. तर या कारवाईने पाटणसह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

No comments

Powered by Blogger.