Your Own Digital Platform

लोणंद सेंट अॅन्सचा बारावीचा निकाल १००%


लोणंद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड कोल्हापूर यांचे मार्फत घेण्यात आलेल्या फेबुवारी २०१८मध्ये बारावीच्या निकालामध्ये सेन्ट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल, अॅन्ड ज्यूनियर कॉलेज,लोणंद ता. खंडाळा विद्यालयाचा निकाल १०० % टक्के लागला असुन, विद्यालयाने सन २o१२ पासूनची आपली १०० % निकालाची ऊज्जल परंपरा कायम ठेवण्यास ते यशस्वी झाले आहेत.

 विशेषत : विद्यालयामध्ये प्रथम तिनही क्रमांकामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे, त्यामध्ये सेंट अॅन्स विद्यालयात प्रथम क्रमांक कु. जाधव रुद्रा विजय हिने सर्वाधिक गुण ८७ .३८ % तर व्दीतीय क्रमाक कु. जाडकर मानसी किशोर ७३ .२३ %, तृतीय क्रमांक कु मचेरी अर्चना शाजी ७२ .९२ % गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सेंट अॅन्सच्या प्राचार्या सिप्टर विन्सी मारीया यांनी केले.