गावाला पाणीदार बनवण्यासाठी पळशीतील महिलेची धडपड


म्हसवड :  सुरुवातीला खुप गाजावाजा करुन पळशी या माण तालुक्यातील राजकियदृष्ट्या नेहमी संवेदनशील राहिलेल्या गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला खरे तर या गावाचा सहभाग हाच संपुर्ण तालुक्याला आश्चर्यजनक वाटणारा असा होता तरीही या गावाने या स्पर्धेत सहभागी होत श्रमदानानाचे काम मोठ्या झपाट्याने सुरु केले मात्र नंतरच्या काळात या गावाने श्रमदानाच्या कामी नांगी टाकल्याचे दिसुन आले असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावाला पाणीदार बनवायाचेच यासाठी या गावातील विजयालक्ष्मी खाडे या महिलेने आपले श्रमदानाचे काम आजवर अखंडीतपणे सुरु ठेवत आपल्यातील व्यंगावरही मात केली आहे.

संकल्प व सचोटी असेल तर कोणतही काम करण सोप असत वर्षेनुवर्षे असलेला दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पळशी , ता-माण येथील एक किडनी नसणाऱ्यां विजयालक्ष्मी खाडे ही ध्येयवेडी महिला दररोज श्रमदानात सहभागी होत असुन त्या व्यंग असुनही अखंडितपणे श्रमदानात दंग असतात .

माण तालुक्यात सर्वच पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी गावात धुमशान सुरू आहे , ह्या वर्षी पळशी गावानेही सहभाग नोंदवला असुन या गावामध्ये पाणी फाऊंडेशनच काम सुरू आहे , गतवर्षी माण तालुक्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन दुष्काळमुक्ती केली आहे त्यामुळे आपल्या गावानेही सहभागी व्हावे हि खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती यासाठी सुरवातीपासुनच विजयालक्ष्मी ह्यांना प्रत्येक सभा व बैठका यांना उपस्थित राहुन त्यांनी गावाने सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले , त्यांची लहानपणी ऑपरेशन झाले असुन तेव्हापासून एकच किडनी आहे , त्या पळशी येथील अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात.

त्यांनी दुष्काळमुक्तीसाठी लढा उभारला असुन त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालयात शिपाई असलेले पती राजेंद्र खाडे यांचीही साथ मिळत आहे , जलसंधारणाच्या कामासाठी दोघांनीही हाती टिकाव व खोरे घेतल आहे ,पळशी गावाला नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागला आहे येथे अनेक विहीरी कोरड्या पडल्या असुन किमान पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी उपलब्ध होण्यासाठी विजयालक्ष्मींची धडपड असुन त्यांच सर्वत्र कौतुक केल जात आहे.


पळशी गावाला नेहमीच दुष्काळाला तोंड द्यावे लागत असुन येथे सध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असुन सध्या पंधरा दिवसातुन गावाला पाणीपुरवठा केला जात असुन ही पाणीटंचाई दुर करायची असेल तर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे गरजेचे असुन त्यासाठी आम्ही जलसंधारणाच्या कामासाठी हातभार लावत आहोत .
 
- सौ.विजयालक्ष्मी खाडे , पळशी .

No comments

Powered by Blogger.