आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

म्हसवड शहरात दिवसाच होवु लागलीया स्मशान शांतता


म्हसवड : माण तालुक्यात सध्या सुर्य आग ओकु लागल्याने जवळपास ४० ते ४१ अंश डिग्री सेल्सियस तपमान निर्माण होत असुन यामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होवु लागली आहे हवेत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नेहमी गजबजलेले रस्ते दुपारच्या वेळेत ओस पडल्याचे चित्र सध्या म्हसवड शहरात दिसत असल्याने ही शांतता पाहुन अचानक इतना सन्नाटा क्यो है भाई असे शब्द आपसुकच तोंडातुन पडल्याशिवाय रहात नाही.

१९८० च्या दशकात आलेल्या सुपरहिट शोले या चित्रपटातील चरित्र अभिनेता ए. के. हंगल यांचा इतना सन्नाटा क्यो है भाई हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे, हा डायलॉग त्या चित्रपटाची गरज होती त्यामुळे तो ए. के. हंगल यांना देण्यात आला होता मात्र सध्या अशी कोणतीही गरज अथवा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु नसतानाही प्रत्येकजण हाच डायलॉग म्हणताना म्हसवड शहरात दिसत आहे, त्याचे कारण म्हणजे याठिकाणी असलेले तपमान, खरेतर माण तालुक्यात रखरखते ऊन नेहमी पहावयास मिळते उन्हाळ्याच्या कडक उन्हाची माणवासीयांना तशी सवयच झालेली आहे त्यामुळे येथे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे, सातारा जिल्ह्यातील पुर्वेकडील शेवटचे टोक म्हणुन माण तालुका ओळखला जातो याच सातारा जिल्ह्यात महाब्ळेश्वर सारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ असुन ते जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे जिल्ह्याच्या दोन्ही टोकाला एकदम विरोधाभास अशी परिस्थिती असल्याने माण तालुका हा विकासाच्या व पाण्याच्या बाबतीत इतरांच्या मानाने काहीसा मागासलेला याच माण तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेले शहर म्हणुन म्हसवड शहराची ओळख आहे या शहरावर परिसरातील १२ वाड्या १२ वस्त्यांचा दैनदिंन व्यवहार अवलंबुन असल्याने शहरात सतत नागरीकांची वर्दळ सुरु असते, मात्र सध्या ही वर्दळ फारच कमी झाल्याचे चित्र असुन यामुळे येथील बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम झाल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या शहराचे तपमान हे जवळपास ४१ अंश डिग्री सेल्सियस इतके आहे त्यामुळे सर्व जिवमात्राच्या अंगाची लाहीलाही होत आहे अक्षरक्षा सुर्य याठिकाणी आग ओकु लागला असुन गतवर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच कडक असल्याचे नागरीकांतुन बोलले जात आहे याच प्रचंड उन्हामुळे प्रत्येकजण आपली दैनंदिन कामे ही सकाळच्या अथवा सायंकाळच्या सत्रात उरकु लागला आहे, दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्यासाठी सहसा कोणी तयार नसल्याने दुपारच्या सत्रात येथील नेहमी गजबलेली ठिकाणी ओस पडल्याचे दिसत आहे तर बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे, खरेतर म्हसवड शहराची बाजारपेठ ही खुपच अरुंद असल्याने याठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी निर्माण होते, मात्र यंदा हीच बाजारपेठ दुपारच्या सत्रात ओस पडत असल्याने याठिकाणी कमालीची निरव शांतता पसरली आहे ही शांतता पाहुनच शोले या सुपरहिट चित्रपटातील तो सुपरहिट डायलॉग अनेकांच्या तोंडातुन येत आहे इतना सन्नाटा क्यो है भाई.


सध्याच्या कडक उन्हामुळे प्रत्येकजण झाडाचा शोध घेताना दिसत आहे तर घरात असणारे घरगुती पंखे, कुलर व ऐसी सुध्दा या प्रचंड उन्हामुळे गरम हवा बाहेर फेकत असल्याने या सुखवस्तु सु्ध्दा यंदाच्या उन्हाळ्यात कुचकामी ठरु लागल्या आहेत.