राजुरी चौफुला येथे गतिरोधक बसवावा अन्यथा आंदोलन


राजुरी : राजुरी चौफुला या ठिकाणी राजुरी, मुंजवडी, कुरवली बु, गटकुळवाडी, आंदरूड या मुख्य गावांसह इतर गावांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुणे - पंढरपूर महामार्ग लगत राजुरी चौफुला वसला आहे. त्यामुळे येथे अपघातात रोजच होत आहेत.

राजुरी चौफुला येथे पाच मंगल कार्यालये आहेत, ढाबे व हाॅटेल ही जादा प्रमाणात आहेत तर मोठ्या प्रमाणात दुकानदारी व्यावसाय वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कार्यालयात लग्न समारंभ असेल तर अपघात हा ठरलेला असतो. कुरवली बु ॥ व मुंजवडी कडे जाणाऱ्या रस्त्यामुळे हा चौक डेंजर झोन झाला आहे. त्यामुळे अपघाताची मालिका रोजच सुरू आहे.

या चौकात अनेक अपघातात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकांना अपंगत्व आले आहे. या चौकात गतिरोधक बसवण्यासाठी आणखी किती लोकांचे प्राण गमवावे लागतील व कित्येकांना अपंगत्व आल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी होणार आहे ?

या चौका लगतच जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यामुळे या रस्त्याने शाळकरी मुलांची ये जा असते. सदर चौकात गतिरोधक न बसल्यास येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी संबंधित विभागाने या रस्त्यावर गतिरोधक बसवावा ही मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.