वरकूटे-मलवडीच्या प्रतिक जाधवची आर्मी ऑफिसरपदी नियूक्ती


म्हसवड : माण.तालूक्यातील वरकूटे-मलवडी येथील सूपूत्र प्रतिक बबन जाधव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ( एन डी ए ) परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . भारतातून १८९ रॅकिंगने भारतीय लष्करी सेवेत निवड झाली असून आर्मी ऑफिसरपदी नियूक्ती झाली आहे .

माण. तालूक्याला प्रशासकीय सेवेची उत्तूंग परंपरा लाभली आहे . स्पर्धा परिक्षेचा कोणताही निकाल असू द्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये माण.तालूक्यातील एक तरी सूपूत्र असतोच तीच परपंरा वरकूटे-मलवडीच्या प्रतिक जाधव यांनी राखली आहे.

प्रतिक जाधव यांचे आई-वडील शेतकरी आहेत. चूलते सुरेश दिनकर जाधव हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आहेत. शेतकरी कूंटूबांत जन्म घेतलेल्या प्रतिक जाधव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वरकूटे-मलवडी येथे झाले . वरकूटे-मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल मधून सातारा येथील सैनिक स्कूलसाठी निवड झाली.इ १२ वी. पर्यंत सैनिक स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. बारावी नंतर अकलूज येथील शंकरराव मोहिते - पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला . अकलूज येथे शिक्षण घेत असतानाच सन २०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी ( एन डी ए ) स्पर्धा परिक्षेत भारतातून १८९ रॅकिंगने आर्मी ऑफिसरपदी निवड झाली आहे .

सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या माण. तालूक्यातील वरकूटे-मलवडी येथील प्रतिक जाधव रहिवाशी असून त्यांचे वडील बबन दिनकर जाधव , आई सौ सूलभा बबन जाधव हे प्रगतशील शेतकरी आहेत . चूलते सुरेश दिनकर जाधव हे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आहेत . सध्या ते भिंवडी येथे कार्यरत आहेत. भाऊ गूंजन सुरेश जाधव हे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आहेत. बहीण कू.स्नेहल सुरेश जाधव ही ऑस्ट्रोलिया येथे मास्टर ऑफ इंजिनियरिंगचे उच्च शिक्षण घेत आहे. दुसरी बहीण कू.श्वेता सुरेश जाधव हीने कॉप्यूटर इंजिनियरिंचे शिक्षण पूर्ण करून ठाणे येथे सायबर क्राईममध्ये कार्यरत आहे. तर लहान भाऊ पै.प्रांजल जाधव व सूरज जाधव हे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. जाधव कूंटूबांतील सगळ्यांनांच शैक्षणिक वारसा मिळालेला आहे.

प्रतिक जाधव यांच्या यशाबद्दल माण.तालूक्यातील शैक्षणिक , सामाजिक , राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.