कॉलर काढायची का विजार हे जनता ठरवेल : रामराजे


सातारा: कुणाची कॉलर वर जाणार, कुणाची खाली जाणार तसेच कुणाचा शर्ट, इजार काढायची हे जनता ठरवेल. खासदार उदयनराजेंनी बोलतो त्याप्रमाणे करून दाखवावे. त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील. उमेदवारीचा निर्णय खासदार शरद पवार साहेब कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतील. त्या निर्णयाची आम्ही सर्वजण वाट पाहात आहोत. निवडणुकीपूर्वी अशा चर्चांना माझ्या दृष्टीने महत्त्व नाही, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबाळकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांना लगासातार्‍यातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पवार साहेब घेतील. त्यांच्या विचारांशी आम्‍ही बांधील आहोत. उमेदवारीचा निर्णय दिल्‍लीत होत असेल तर त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हालाही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे रामराजे म्‍हणाले.

अद्यापही पवार साहेबांनी उमेदवारी संदर्भात आमच्याशी चर्चा केलेली नाही. कोण म्हणंत असेल आम्हाला उमेदवारी दिली आहे, त्याबाबत साहेबांशी सर्व आमदार बोलतील. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देऊ. तसेच या खासदारांची १० वर्षाची कामगिरी गिनीज बुकात नोंद करण्यासारखी आहे, असा टोला शेवटी लगावला.वला.

No comments

Powered by Blogger.