Your Own Digital Platform

मायणीत हायहोल्टेजचा १२ कुटुंबांना फटका


मायणी :  मायणी ता खटाव. येथील इंदिरानगर(बेघरवस्ती) परिसरामध्ये आज बुधवारी सकाळी आठ वाजता अचानक झालेल्या हायहोल्टेज वीजपुरवठ्यामुळे येथील १२ कुटुंबांचे मोेठे नुकसान झाले असुन  यामध्ये ४ टीव्ही , १ फ्रीज ,४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक जळून खाक झाले असुन  १२ कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
          याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार येथील इंदिरानगर (बेघर वस्ती) येथे असलेल्या इंदिरानगर वीजडिपीवरुन अचानक अतिउच्च दाबाने वीज पुरवठा झाला. त्यामुळे या वस्तीत राहणाऱ्या शालन माने, मेहबुब नदाफ, शफीक बागवान,प्रकाश भिसे यांचे टीव्ही,राजेश खैरमोडे यांचे सेटअप बॉक्स, रवी भिसे, राजू कमाने, प्रशांत माने,दशरथ जाधव यांचे पंखे.सुनील बनसोडे यांचे होम थेटर, प्रशांत माने यांचे फ्रीज,  कुंडलिक जाधव यांचे सर्व बल्ब, राजू कमाने यांच्या व इतर ठिकाणावरिल सर्व लाईट फिटिंग अशा सर्व वस्तु जळुन खाक झाल्या आहेत.
          अचानक झालेल्या या अतिउच्च दाब वीज पुरवठ्यामुळे येथील सुहास माने याने वीजवितरण कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी श्री पेंदाम हे लगेच त्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी तपासणी केली असता वीज वाहून नेणाऱ्या तारा एकमेकांना चिकटली असल्याने हा अतिउच्च दाबाने वीज पुरवठा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

भरपाई मिळणार का ?          
        सदर घटनेची ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी महेश जाधव यांनी चौकशी करून येथील वीज वितरण अधिकारी ए.डी.लोखंडे यांच्याशी संपर्क साधुन  या बारा कुटुंबांना त्यांच्या झालेल्या वस्तूंची भरपाई मिळणार का असे विचारले असता वरिष्ठांशी विचारून सदर  घडलेल्या घटनेचे नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले जातील असे सहाय्यक अभियंता ए.डी.लोखंडे यांनी सांगितले.