आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

शेगर धनगर समाजाचा माळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न


राजुरी : हिंदू शेगर धनगर समाजसेवा महास॔घातर्फे सतरावा सामुहिक विवाह समारंभ माळेगांव बु. ता.बारामती येथील माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे  'शिवतिर्थ मंगल कार्यालय 'येथे मोठ्या उत्साही वातावरणात थाटात पार पडला.

गेल्या सतरा वर्षेपासुन हिंदू शेगर धनगर समाजसेवा महास॔घातर्फे सामुहिक विवाहास प्रोत्साहन मिळावे समाजातील अवाजावी खर्च टाळून चुकीचे रूढी परंपराना फाटा देण्याच्या उद्देशाने लोककल्याणकारी सामुहिक विवाह चळवळीस बळकटी यावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.सामुहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील अनेक मान्यवर एकञ येतात विचारांची देवाण-घेवाण आदान-प्रदान होवून समाज एक संघ राहण्यासाठी मदत होते  यामुळे वेळ, पैसा, श्रम वाचतो सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये आज पर्यंत नवशे एक्कावन विवाह सामुदायिक विवाह पध्दतीने  पार पडले आहेत.
           
सदर सोहळ्यात 20 विवाह लावण्यात आले. तर हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडण्यासाठी अॅड. जी.बी.गावडे, तानाजी आण्णा गावडे, वामनराव भुरे, प्रा.अनंता रोटे, शिवलाल गावडे सर, आर.आर.गावडे आदी महासंघातील पदाधिकारीनी परिश्रम घेतले.
   
  विशेष सहकार्य  नवनाथ उद्योग समुहाचे संग्राम सोरटे ( जेवण ) निकीता कार्ड्स बारामती( संपूर्ण छापाई) आणि सौ.सविता बजरंग खटके( पिण्याच्या पाण्याचे  जी.आर. ) सुनील कांबळे( अक्षदा साठी तांदूळ ) चे सहकार्य केले. .या विविध सोहळ्यातील शेगर धनगर समाजसेवा महास॔घाचे सदस्य  अनंता रोटे(सर)सौ.निर्मलाताई रोटे समाजातील या सामाजिक कार्यासाठी  गेली चौदा  वर्षे रूपये दहा हजार प्रती वर्षी प्रमाणे एक लाख चाळीस हजार रूपये  देणगी म्हणून महासंघास दिल्याबद्दल  महासंघाचे वतीने आमदार दत्तामामा भरणे यांचे हस्ते श्री व सौ.रोटे दांम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी इंदापूर चे आमदार दत्तात्रेय भरणे मामा,  पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास  देवकाते  उर्फ नाना पाटील, माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजनकाका तावरे, छञपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश घोलप,भारत गावडे पाटील, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर ,फलटण तालुका दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी पोंदकुले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनील भगत,अॅड बाबुराव गावडे, उध्दवसाहेब गावडे, बजरंग गावडे(सवई, ) राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांचे नेते बजरंग नाना  खटके, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.उषादेवी गावडे, फलटण पंचायत समिती च्या माजी सभापती वैशालीताई गावडे, फलटण पंचायत समिती चे माजी सभापती रामभाऊ ढेकळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.संपतराव जायपञे, शिवलाल गावडे सर, अमोल धापटे यांनी केले.