तहसिलदार माने यांच्या पदोन्नतीने माणवासीयांच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्यां डोळ्यात अश्रु


म्हसवड : माणच्या माथी जरी दुष्काळी असा शिक्का असला तरी हा शिक्का पुसण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेवुन एक लोकचळवळ उभी केली तीच लोकचळवळ आज माण तालुक्याच्या गावोगावी आपला गाव पाणीदार बनवण्यासाठी झटत असुन ही लोकचळवळ ऊभी करण्याचे काम करणार्या माणच्या तहसिलदार सुरेखा माने यांना यामुळे पद्दोनती निश्चित मिळाली असली तरी याच मातीतील एका प्रशासकिय अधिकार्याला निरोप देताना मात्र प्रत्येक माण वासीयाच्या एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात अश्रु नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आनंद यासाठी कि याच मातीतील एका कर्तव्यदक्ष महिला अधिकार्याच्या कामाची पदोन्नतिने सन्मान झाला आहे तर याच आपल्या अधिकार्याला आता आपल्यालाच निरोप द्यावा लागत आहे.

माण तालुका टॅकर मुक्त करण्या बरोबर पाणीदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असुन त्यांनी जलसंधारणाच्या केलेल्या गतीमान कामामुळे ऐरवी टॅकरसाठी रस्त्यावर येणाऱ्यां दुष्काळी माण तालुक्याने टॅकर मुक्तीकडे वाटचाल केली आहे , त्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याने माणवासीयांच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्यां डोळ्यात अश्रु पहायला मिळत आहेत.

माण तालुक्यांने शेकडो मोठ-मोठे अधिकारी घडवले असुन जन्मभुमीची सेवा करण्याचे भाग्य माणदेशी रत्न असलेल्या तहसिलदार सुरेखा माने या कन्येला मिळाले त्यांच माहेर काळचौंडी तर सासर धामणी आहे , तिन वर्षापूर्वी त्यांची माणच्या तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती झाली , तेव्हा पासुन कर्तव्याची कसुर न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावुन सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनल्या , तसेच माण तालुका पाणीदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून पाणी फाऊंडेशन मध्ये सहभागी गावांना या प्रवाहात आणुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबरोबर जनतेला काम करण्याची ताकद दिली आहे , पदभार स्वीकारल्यापासून गावंना गाव, वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या , अनेक गावातील वादविवाद मिटवुन गावे एक केली आहेत .वर्षानुवर्षे पाणी टंचाईच्या झळा माणतालुक्याला सोसाव्या लागतात , दुष्काळ हा तर पाचवीला पुजलेलाच आहे , माणच्या मातीतील माणसाची पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची तहान आज पर्यंत भागली नाही , माञ गत दोन वर्षांपासुन माण तालुक्याच्या उजाड माळराणावर कुसळा ऐवजी आत्ता हिरवा शालू दिसू लागला आहे , या जल क्रांतीच्या खऱ्या 'जलनायिका' माणच्या तहसिलदार सुरेखा माने असल्यानेच त्यांना अनुलोम सन्मित्र (उत्कृष्ठ तहसीलदार) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी माण तालुक्यातील तब्बल ६६ गावांनी वाॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असुन या सर्व गावान या जलप्रवाहात आणण्यासाठी त्यांनी व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अहोरात्र कष्ट घेतले अगदी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत सभा घेतल्या त्यामुळे सध्या माण तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू असुन भविष्यात माण पाणीदार होणार आहे हे मात्र नक्कीच , "असुन अधिकारी तरीही व्यवहारी" या पध्दतीने सुरेखा माने यांनी काम केल असुन भविष्यात प्रशासनात येणाऱ्यां तरूण पिढीपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

खरेतर बहुतांशी प्रशासकिय अधिकारी हे कोणतेही काम करताना ते काम आपल्या कर्तव्याचा एक भाग समजुन करीत असतात त्यामुळे ते ज्याठिकाणी कार्यरत असतात तोवर तेथील सामान्य जनता त्यांच्या मागे पुढे करत असते पण तहसिलदार माने यांची जन्मभुमीच माण असल्याने या मातीचे आपण काही देणे लागतो या मातीला आपण सुजलाम् सुफलाम करणे गरजेचे आहे हे ओळखुनच त्यांनी तालुक्याचा पदभार स्विकारल्यापासुन सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य दिले त्यामुळे माणच्या जनतेनेही या अधिकार्याला नेहमीच आपले मानले, मातीचा हा ओलावा जपणार्या या अधिकार्याच्या पाठीशी माणची सामान्य जनता नेहमीच उभी राहिल यात शंका नाही.
No comments

Powered by Blogger.