शरदचंद्र पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा


लोणंद : लोणंद ता. खंडाळा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात मंगळवार दि. १५ मे २०१८ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्यास शरदचंद्र पवार महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्री.हणमंत शेळके पाटील, उपाध्यक्ष नितीन हरिभाऊ माने, सचिव प्रा.भिमराव हरिबा काकडे, खजिनदार प्रा.श्रीकांत संभाजी शिंदे व माजी विद्यार्थी मंडळाचे सर्व सभासद, प्राचार्य डाॅ.टी.एन.घोलप, पत्रकार श्री.सुरेश भोईटे सर, श्री.संतोष खरात तसेच मोठ्या संख्येने १९८६ पासून पदवी शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास उपस्थित होते.

माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्री.हणमंत शेळके पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, २०१८-१९ मध्ये महाविद्यालयात 'नॅक' समिती तपासणीला येणार असल्याने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्मवीरांच्या विचारांचे पाईक होऊन महाविद्यालयाच्या विकासामध्ये निश्चितच भर टाकण्याच्या कामाकरिता माजी विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून निधीचे संकलन करण्यात येईल. महाविद्यालय परिसरात वृक्षलागवड करून परिसराचे सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करू असेही सांगितले.

प्राचार्य डाॅ.टी.एन.घोलप यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी मंडळाचे स्वागत केले. महाविद्यालय उभारणीमध्ये माजी विद्यार्थी मंडळाचे योगदान उत्तरोत्तर वृध्दिंगत होऊन एक नावाजलेले महाविद्यालय म्हणून आपल्या महिविद्यालयाची भरभराट होईल असा आशावाद व्यक्त केला.

या स्नेहमेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांमधून सागर शेळके,, प्रा.अमीर इनामदार, प्रा.समीर धुमाळ, व्यावसायिका वर्षा चोरगे, श्रीधर धायगुडे, श्री.पवार सर, गोरख कापसे, दिपक नलवडे सर, प्रा.किशोर गाढवे, सुशील वाघमारे यांनी आपली मनोगते व्यक्त करून महाविद्यालय उभारणीमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या स्नेहमेळाव्याचे संयोजन प्रा. एस.व्ही.गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.संजीव बोडखे यांनी केले तर आभार माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव प्रा.भिमराव काकडे यांनी मानले. 

No comments

Powered by Blogger.