पानी फाऊंडेशनच्या कामी अशीही मदत


म्हसवड : सध्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे तुफान गावोगावी आले असुन माण तालुक्यात तर या स्पर्धेचे धुमशान सुरु आहे या स्पर्धेतील सहभागी गावांना आता अर्थिक मदतीची गरज भासु लागली असुन त्यांना खारीची अर्थिक मदत आपल्याकडुन व्हावी या उद्दात्त हेतुने म्हसवड येथिल अजिम तांबोळी या युवकाने आपल्या दुकानात पानाच्या होणार्या विक्रीतुन प्रति पानातुन १ रुपया हा पानी फाऊंडेशनच्या कामी देण्याचा संकल्प केला आहे, त्याच्या या अनोख्या संकल्पाचे सध्या म्हसवडकरांना कुतुहल वाटत आहे.

राज्यभरात अनेक सामाजीक संस्था नेहमीच सामाजीक कार्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात त्यासाठी काही कंपन्याही पुढाकार घेतात जसे की आमुक एक साबण घेतला अथवा पेस्ट घेतली की त्यातील १ रुपाया हा विविध प्रकारच्या सामाजीक काम करणार्या एनजीओंना दिला जातो अशी जाहीरात आपण नेहमी टेलीव्हिजनवर पहात असतो त्यामुळे ती जाहीरात पाहणार्याला या सामाजीक कार्यास आपलाही हातभार लागावा असे वाटल्याने तो ती वस्तु खरेदी करतो यामुळे कंपनीचाही फायदा होतो व सामाजीक कार्यास मदतही होते नेमका हाच धागा पकडुन येथील अजिम रफीक तांबोळी या युवकाने सध्या सुरु असलेल्या वॉटर कप स्पर्धेला अर्थीक मदत करण्याचे ठरवले त्यासाठी त्याने अनोखी शक्कल लढवली आहे, अजिम याचा पानपट्टीचा व्यावसाय असुन त्याच्याकडे विविध प्रकारची खाऊची पाने खाणार्यांची नेहमी खुप गर्दी होत असते सध्या त्याच्याकडे मसाला पान, साधा पान, चॉकलेट पान, स्टॉबेरी पान, बटरस्कॉच पान, व्हनिला पान, मँगो पान, पायनापल पान, रामप्यारी पान आदी विविध प्रकारचे पान खाण्यासाठी पान खवैय्यांची मोठी गर्दी होते यातील प्रत्येक पानाची किंमत ही १० रुपयांहुन अधिक असुन रोज कमीत कमी ५०० ते ७०० विविध पानांची विक्री होते या प्रत्येक पानाच्या विक्रीतुन प्रती पानामागे १ रुपया हा तो पानी फाऊंडेशनच्या कामी देण्याचा त्याचा निर्धार केला आहे त्यासाठी त्याने आपल्या पानटपरीत एक बॉक्स केला असुन त्यावर पानी फाऊंडेशन मदत असे लिहले आहे त्याच्याकडे पान खाण्यासाठी जाणार्याला तो या बॉक्समध्ये आपल्या ईच्छेने पैसे टाकण्याचा सल्ला देत असुन त्याचा हा प्रेमळ सल्ला मात्र अनेकांना आपल्या खिशात हात घालावयास लावत आहे.

केवळ अर्थिक मदत व्हावी हाच हेतु
- अजिम तांबोळी, म्हसवड .

या उपक्रमातुन जी रक्कम जमा होईल त्या रकमेतुन एका गावासाठी हजारो नव्हे तर लाखो लिटर पाणी साठवले जाणार असुन यासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे.

No comments

Powered by Blogger.