दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी खटाव माण साखर कारखाना वरदान ठरेल : नंदकुमार मोरे


मायणी :- पडळ येथे उभा राहत असलेला खटाव माण तालुका अँग्रो प्रोसेसिंग लि.हा साखर कारखाना खटाव ,माण या दुष्काळी तालुक्यातील ऊस उत्पादित शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे , असा विश्वास जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले.ते निमसोड येथे आयोजित शेअर्स वितरण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक उदयसिंह घाटगे,महेंद्र जगदाळे ,दत्ता कोळी,जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन सौ.सविता मोरे ,व्हा .चेअरमन दादासो दगडे ,सोनारसिद्ध वि.वि.से.सोसायटीचे चेअरमन दादासो कदम,व्ह चेअरमेन चंद्रकांत सुतार , शिक्षक बँक संचालक चंद्रकांत मोरे ,मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. मोरे पुढे म्हणाले, ज्यादा उसाच्या उत्पादनाने सध्या सुरू असलेले साखर कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेण्यास असमर्थ ठरत आहेत,याचा फटका खटाव माण या भागातील ऊस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. वेळेत ऊस तोड न होणे, वेळेत बिलाची रक्कम न मिळणे यासह असंख्य प्रश्नांना येथील शेतकऱ्यास तोंड द्यावे लागते.

यासर्व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाला थांबवण्यासाठी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुष्काळी पट्यात साखर कारखाना उभा करण्याचे धाडस आम्ही केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा हक्काचा साखर कारखाना उभा राहणार असून या माध्यमातून शेतकरी बांधवांची आर्थिक पथही कशी उंचावली जाईल याकडेही आमचे लक्ष राहणार आहे.

यावेळी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक उदयसिंह घाटगे म्हणाले, सध्या उभा राहत असलेला खटाव माण कारखाना फक्त साखर उत्पादनच नाही तर वीज निर्मितीसह अन्य घटकांची निर्मिती करणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

‎श्री घाटगे यांनी कारखान्याच्या सध्या सुरू असलेल्या कारखाना उभारणीची माहिती,तसेच कारखान्याच्या अन्य सुविधांची माहिती उपस्थित शेतकरी ग्रामस्थांना दिली.

‎निमसोड ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा नियोजन समितिचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोरे,शामराव मोरे,श्रीरंग मोरे,जनार्दन मोरे ,अशोक मोरे,तानाजी घाडगे,तुकाराम घाडगे,विजय भादुले ,धनाजी चव्हाण,रविंद्र भादुले,समाधान मोरे ,विष्णूपंत कदम,मनोज शितोळे,मोहन शितोळे,वसंत घाडगे ,दादा घाडगे,तानाजी मोरे,वसंत मोरे हेही या कार्यक्रमस उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार चंद्रकांत मोरे यांनी केले.

No comments

Powered by Blogger.