म. फुले वसतिगृहात मागासवर्गीय विध्यार्थ्यांना मोफत प्रवेश


मायणी : कलेढोण ता. खटाव परिसरात नावलौकीक मिळवलेल्या हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, कलेढोण संचलित महात्मा फुले दलित विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या शासनमान्य वसतिगृहात अनु. जाती,जमाती,भटक्या जाती,जमाती, विशेष मागास, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो.तसेच विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण,नाष्टा, अंथरूण पांघरूण,पेटी, रॅक, गादी, उशी, शालेय क्रमिक पुस्तके, संगणक इत्यादी सुविधा दिल्या जातात.

म. फुले दलित विद्यार्थी वसतिगृहाची सुसज्ज इमारत असून खेळाचे भव्य पटांगण व विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे.वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रवेशाकरिता आधार कार्ड, रेशनिग कार्ड, एक फोटो, उत्पनाचा दाखला,जातीचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रासह पालकांनी वसतिगृह अधिक्षक संजय सादिगले(मो.९६३७८३२३२७) यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

No comments

Powered by Blogger.