अन् पोलवरच लटकला कर्मचाऱ्याचा मृतदेह


कुडाळ : जावली तालुक्यातील सरताळे काळेवाडी येथे विजेच्या खांबावर काम करत असताना वीज प्रवाह सुरु केल्याने एका खासगी कर्मचाऱ्याला आपा जीव गमावला आहे. हणमंत गंगाराम पोतेकर वय 35 असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी .सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील असल्याची माहिती समजते आहे. दुपारी 12 .30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

सरताळे काळेवाडी येथे विजेच्या पोलवर लाईन ओढण्याचे काम सुरू असताना अचानक पोल वरील वीज प्रवाह सुरु झाला. बघता बघता एक़ा क्षणात पोलवरील काम करत असलेला खाजगी कर्मचारी मृत्युमुखी पडला. या घटनेने कुडाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजेच्या पोलवर काम करत असताना सरताळे विभागातील हा दुसरा मृत्यू आहे. सुमारे 2 तास मृतदेह पोलवर लटकत होता.

No comments

Powered by Blogger.