विकास गंबरे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड


म्हसवड : पळशी ता.माण येथील विकास लक्ष्मण गंबरे याची नुकतीच विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.

माण तालुका म्हटलं की दुष्काळ असला तरी बुद्दीचा सुकाळ पावलोपावली जाणवत असून स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त यश मिळवणारे विद्यार्थी माण तालुक्यातील आहेत.विकास गंबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण म्हसवड येथे झाले.मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी घेऊन त्यांनी पुणे येथे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांची विक्रीकर निरीक्षक म्हणून नुकतीच निवड झाली

त्यांच्या या यशाबद्दल विकासाच्या आईवडिलांनी त्याला पेढा भरवून आनंद व्यक्त केला.अत्यंत गरीब परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन विकास ने यश मिळवले त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments

Powered by Blogger.