ना. रामदास आठवले रविवारी पाटण दौऱ्यावर


पाटण : मौजे डावरी ता. पाटण येथे बौद्ध विकास तरूण मंडळ ,समता प्रतिष्ठान व अॅन्टेलोप फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, व भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न प.पू.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम रविवार दि. २० मे रोजी सकाळी ठिक १० वाजता साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदासजी आठवले उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. बी.ए. चोपडे, पाटणचे आमदार शंभुराज देसाई , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डाॅ. विलास आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रम दैनिक वृतरत्न सम्राटचे संपादक बबन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

मनोरंजनासाठी रात्री ८ वाजता तुफानातले दिवे वाद्यवृंद आॅकेॅस्ट्रा मुंबई यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी या कार्यक्रमास पाटण तालुक्यातील बहुजन समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.