Your Own Digital Platform

तहसीलदार सुरेखा माने यांचा उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाल्याने धामणीत नागरी सत्कार


म्हसवड :  माणच्या तहसीलदार जलनायिका सुरेखा माने यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याने धामणी येथे नागरी सन्मान व सत्कार करण्यात आला, धामणी ता. माण येथिल पिसाळवस्ती प्राथमिक शाळेत सत्कार करण्यात आला, या शाळेचे मुख्याध्यापक सतेशकुमार माळवे यांचे हस्ते फेटा, शाल, श्रीफळ फुलांचा बुफे ,हार व पेढे देऊन त्यांचा यथोचित असा नागरी सन्मान व सत्कार हा करण्यात आला.

या नागरी सत्कार सोहळ्यात तहसीलदार सुरेखा माने यांच्या हस्ते या शाळेला विद्यार्थ्यांसाठी च्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला , या साठी मुख्याध्यापक माळवे यांनी पदरमोड करून काही रक्कम या पाणीपुरवठा पाईपलाईन साठी दिली आहे , या वेळी बोलताना तहसीलदार सुरेखा माने म्हणाल्या कि या माणदेश च्या माझ्या मायभूमीतीला जो आज माझा सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्यांने मी अक्षरशः खूप भारावून गेले आहे , खरे तर हा माझा सन्मान नसून आपल्या सर्वांचा आहे तुमच्या सर्वांच्या आशिर्वादानेच मी उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत जाऊन पोहचलेली आहे येथून पुढच्या काळातही असेच आपले आशिर्वाद हे माझ्या पाठीशी राहावेत माझ्या कार्य यशात तुमच्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे हे मी कदापीही विसरू शकणार नाही, तसेच सतेशकुमार माळवे यांच्या सारखे प्रामाणिक आणि ध्येयवेडे कर्तबगार शिक्षकच आपल्या भावी पिढीला आणि भारत देशाला बलवान आणि सशक्त बनवतील असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या .

या वेळी कार्यक्रमासाठी प्रकाश खाडे -पाटील , श्रीमंत खाडे ,हिराचंद पिसाळ , लक्ष्मण पिसाळ , गुलाब पिसाळ ,चंद्रकांत नाकाडे ,अर्जुन पिसाळ , तानाजी नाकाडे ,अरुण पिसाळ , मोहन पिसाळ , नारायण पिसाळ,मारुती खाडे ,भिमराव पिसाळ व आदि मान्यवर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्याक्ष ,सदस्य, ग्रामस्थ, पालकवर्ग ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ,या कार्यक्रमात स्वागत व सूत्रसंचलन सतेशकुमार माळवे यांनी केले तर आभार प्रकाश खाडे -पाटील यांनी मानले.