जयंत पाटील यांचा स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज


कराड :  कराड (जि. सातारा) येथील नगरपालिका स्‍वीकृत नगरसेवक पदासाठी शनिवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे धाकटे बंधू जयंत पाटील यांनी शुक्रवारी विरोधी लोकशाही आघाडीकडून प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यापूर्वीच भाजपाकडून माजी नगरसेवक फारूख पटवेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच लोकशाही आघाडी आणि भाजपा यांच्यात स्वीकृत पदासाठी लढत होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे, मोहसिन आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार हेही यावेळी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.