सरकार नसल्याने अडचणी भासतात : पृथ्वीराज चव्हाण


कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाडीवस्तीवर मी मुख्यमंत्री असताना मला निधी देता आला, याचे मला खूप समाधान आहे. आता जरी आपले सरकार नसल्यामुळे विकासकामे राबवताना अडचणी भासतात. पण तरीही मी कौशल्याने विकास करत आहे. त्या माझ्या प्रयत्नांना तुमच्या पाठबळाने यश मिळत असल्याचे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

शेवाळेवाडी (उंडाळे) नं. 1 मध्ये बबनराव गणपती शेवाळे यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांशी थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अजितराव पाटील - चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, बाजार समितीचे माजी संचालक प्रतापराव देशमुख, उदय पाटील - उंडाळकर, नितीन थोरात - सवादेकर, मलकापूरचे नगरसेवक मोतीराम शेवाळे, सुनिल शेवाळे, मोतीराम शेवाळे , झुंजार शेवाळे, संभाजी शेवाळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी उदय पाटील-उंडाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

 त्यानंतर सुनिल शेवाळे, मोतीराम शेवाळे , अनिल शेवाळे यांनी पाईपलाईन, सिमेंट बंधारे, पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते आदींबाबत समस्या मांडल्या. त्यावर आ. चव्हाण यांनी प्रशासनामधील संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरुन थेट संवाद साधत समस्यांचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. आ. चव्हाण भाषणात म्हणाले, मी आजपर्यंत विकास कामांसाठी कटिबध्द राहिलो आहे. त्यामध्ये सातत्य टिकवले आहे. तुम्ही कामांची मागणी करा. त्याकामी निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील. अनिल शेवाळे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.