Your Own Digital Platform

मायणीत उद्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर


मायणी :
 श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली व फ्रेंडस ग्रुप मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि समता फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने उद्या मंगळवार दिनांक १५ मे रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले असून या शिबिराचा मायणी व मायणी परिसरातील सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान फ्रेंड्स ग्रुप संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्प दरामध्ये चष्मे वाटप होणार आहे . हे आरोग्य शिबीर मायणी येथील बसस्थानका पाठीमागील श्री सिद्धनाथ मंदिर येथे मंगळवार १५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार असुन या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश जाधव यांनी केले आहे.