आमदार राहुल नार्वेकर यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद अणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील सन २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०१५ - २०१६ साठी विधानपरिषद सदस्यांमध्ये उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार अँड. राहुल नार्वेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातुन अभिननंदन करण्यात आले आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिवालयाचे प्रधान सचिव आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव डॉ. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

No comments

Powered by Blogger.