अजित पवारांची अपघातग्रस्त व्यक्तीला मदत


वाई : वाई येथील महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर काल रात्री (मंगळवार) ९ वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. रानडुक्कर आडवे आल्याने संतोष बजरंग जाधव (रा. बिबवी) यांच्या दुचाकीचा अपघात झाला. जखमी झाल्याने रस्त्यावर ते बेशुद्ध होऊन पडले होते.

त्या दरम्यान त्याच रस्त्याने महाबळेश्वरवरून एक विवाहसोहळा आटोपून जात असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ही गोष्ट लक्षात आली. पवारांनी तातडीने स्वतःची गाडी थांबवून बेशुद्ध, जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना आपले युवा कार्यकर्ते रविराज तावरे व स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून गाडीमधून सातारा येथील क्रांतीसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येथे पोहच करण्याची व्यवस्था केली.
तसेच स्वत: फोनवरून डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या. आपले कार्यकर्ते व स्वीय सहायक यांना जखमीला रुग्णालयात दाखल करून उपचार झाल्याखेरीज रुग्णालय न सोडण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

No comments

Powered by Blogger.