तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा १६ जणांना चावा


कराड : तांबवे (ता. कराड, जि. सातारा) गावासह परिसरात गुरूवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १६ जणांना चावा घेतला आहे. हा कुत्रा उत्तर तांबवे परिसरातील गावातील असल्याचा आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून सर्व जखमींवर कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने काही ग्रामस्थांना चावा घेतला. त्यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात येईपर्यत या कुत्र्याने तेथून धूम ठोकली होती. दरम्यानच्या कालावधीत गावातील विविध भागात सुमारे १६ ग्रामस्थांना या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास फिरावयास गेलेल्या काही महिलांचाही समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.