महिलेचा स्टोल दुचाकीत अडकल्याने अपघात


सातारा :  येथील जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकला. यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व भीषण अपघात होऊन महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना बाजूला घेतले व उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

अपघातानंतर परिसरात व मुख्यरस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

No comments

Powered by Blogger.