पाण्यासाठी जावली तालुक्यात बोरीचा बार


कुडाळ : तीव्र उन्हाळ्यात एका हंडाभर पाणी मिळावे म्हणून एकवटलेल्या जावली तालुक्यातील डोंगरी भागात असणारे दुंंद आणि ऐकीव गावच्या सरहद्दीवर आज चक्‍क बोरीचा बार भरला. तोडलेली पाईप जोडणी साठी गेलेल्या दुंद ग्रामस्थांना विरोध केल्याने दुंद व ऐकीव ग्रामस्थ महिलांमध्ये तुफान शिवीगाळ व बाचाबाची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दुंंद गावाला ऐकीव गावच्या पाईपमधून पाणी देण्याची सोय करण्यात आली होती. दुंंद गावातील लोकांनी लोकवर्गणीतून गावात ऐकीव सरहद्दीतून पाणी आणलं होतं.

मात्र दुंंद ग्रामस्थांच्या दिलेल्या माहिती वरून स्थानिक राजकारणापोटी दुंद गावच्या दिशेने ऐकीवमधून जोडलेली पाईप कुण्या समाजकंटकाने तोडली व त्यानंतर गावाला पाणी मिळण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. या घटनेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही. उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी होणारी वणवण रोज होणारी फरपट याला कंटाळून सकाळी दुंंद ग्रामस्थ महिला यांनी क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला. एकवटलेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी ऐकीव गावातील पाईप जोडून गावात मुबलक पाणी आणण्याचा निर्धार केला. ग्रामस्थ, महिलांसंह आज दुपारी एकीव येथे गेल्यावर एकीव ग्रामस्थ, महिला विरूद्ध दुंद ग्रामस्थ, महिला असा पाण्यावरून जोरदार संघर्ष सुरू झाला.

No comments

Powered by Blogger.