जावली येथील महादेव मंदिरास रंग देण्याची मागणी


जावली : जावली ता फलटण गावातील मुख्य चौकातील शंभु महादेवाच्या मंदिरास रंग देण्याची मागणी भाविक भक्त ग्रामस्थांमधुन होत आहे .

  गावातील मुख्य चौकात मंदिर असुन या मंदिरा ला गेल्या अनेक वर्षापासून रंगकाम करण्यात आले नाही मंदिराच्या शिकराला तडे गेले आहेत. ग्रामस्थ ग्रामपंचायत याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत फलटण च्या नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे अधिपत्या खाली येथील जावलसिध्दनाथ तसेच शंभु महादेवाचे मंदिराचे व्यवस्थापन करण्यात  येत आहे गेल्या तीन वर्षापुर्वी मंदिराच्या बाजूची पडझड झालेल्या भिंतींची डागडुजी करण्यात आली आहे याकडे लक्ष देवुन जावली ग्रामपंचायत नाईक निंबाळकर  देवस्थान ट्रस्ट यांनी लक्ष घालुन या मंदिराचे रंगकाम करण्याची मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.