गाव पाणीदार व्हावा यासाठी बहिण भावाची एकाकी झुंज


म्हसवड : संपुर्ण राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे धुमशान सुरु असुन माण तालुक्यात ही या स्पर्धेचे जोरदार धुमशान सुरु असले तरी याच तालुक्यातील एक गाव असे आहे की या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही केवळ आपल्या गावाला पाणी मिळावे व आपले गाव टँकरमुक्त व्हावे यासाठी गोंदवले खुर्द येथिल रोहित शंकर बनसोडे व त्याची बहीण रक्षिता या बहिण भावांनी एकत्र येत गत १ महिन्यांपासुन या गावच्या परिसरातील जानाई तलावानजीक एक नव्हे २ नव्हे तर चक्क ३५ सिसिटी तयार केले असुन याबरोबरच या बहाद्दरांनी १ भरावही तयार केला असल्याने या बहिण भावाचे आता माण तालुक्यात सर्वत्र कौतुक तर होतच आहे पण या दोघांची पाण्यासाठीची तळमळ पाहुन त्यांनी केलेले काम पाहुन निश्चीतच गोंदवलेकरांना आता त्यांचा अभिमान वाटत आहे.

माण तालुक्यात २ गोंदवले असुन १ महाराजांचे गोंदवले तर दुसरे खुर्द गोंदवले या गावाने यंदा होत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला नसल्याने या गावात वॉटर कप स्पर्धेचे काम सुरु नाही परंतु माण तालुक्यातील ६६ गावे या स्पर्धेत उतरली असुन त्याठिकाणी श्रमदानाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे या गावातील १६ वर्षीय युवक रोहित याने वर्तमानपत्रातुन वाचले आज जरी आपल्या गावाला पाणी टंचाई नसली तरी भविष्यातही ती जाणु नये यासाठी त्याने एकट्यानेच हाती कुदळ, पाटी व खोरे घेत थेट या गावच्या परिसरातील जानाई तलावानजीक असलेल्या टेकडीच्या उतारावर सिसिटी खोदण्यास सुरुवात केली सुरुवातीला नव रक्त आहे २ दिवस नाटक करेल अन बसेल शांत असे म्हणुन सर्वांनीच त्याच्याकडे दुर्लक्ष केले या २ ते ३ दिवसात त्याने एकट्यानेच सिसिटी तयार केली त्याच्यानंतर त्याची लहान बहिण रक्षिता (वय १३) ही त्याच्यासोबत त्याठिकाणी जावुन त्याला मदत करु लागली, वास्तवीक हे बहिण भाऊ ज्या ठिकाणी काम करीत आहेत ते ठिकाण गावापासुन दुर व निर्जन असे असल्याने त्याठिकाणी लांडग्यांचा वावर आहे या लांडग्यांचा आपल्या मुला मुलीस त्रास होवु नये यासाठी त्यांचे वडील शंकर बनसोडे हे पुन्हा त्यांच्यासोबत याठिकाणी जावु लागले, वास्तवीक आपले गाव या स्पर्धेत सहभागी नसताना आपली मुलं ही बिनकामाचा उद्दयोग कशासाठी करीत आहेत असा प्रश्न त्यांच्या वडीलांनीही पडला मात्र मुलांची त्यासाठी असणारी चिकाटी पाहुन नंतर त्यांनीच याकामी त्यांना प्रोत्साहन दिले, आज जवळपास १ महिन्यांपासुन हे बहिण भाऊ याठिकाणी काम करीत असुन आजवर या दोघांनी मिळुन सुमारे ३५ सिसिटी तयार केले आहेत हे सिसिटी वॉटर कप स्पर्धेप्रमाणे निश्चीत नाहीत परंतु त्यामागची भावना मात्र निश्चीतच प्रामाणीक आहे, त्यांचे हे रोज सुरु असलेले काम पाहुन याठिकाणाहुन रोज जाणार्या एका ट्रक्टरचालकाला त्यांचे कौतुक वाटल्याने त्याने भरावाकामी त्यांना मदत केली असल्याचे रोहित व रक्षिता सांगतात आज या भरावास पिचींग करण्याचे काम सुरु असुन लवकरच हे काम पुर्नत्वास जाईल असेही ते सांगत आहेत. तालुक्यात सर्वत्र श्रमदानाचे धुमशान सुरु असताना या दोघांनी मात्र शांतपणे सुरु केलेले काम निश्चीतच कौतुकास्पद आहे स्पर्धेत सहभागी नसल्याने नंबरचा विषयच नाही मात्र झालेल्या या कामाचा गावाला निश्चीतच फायदा होईल असा विश्वास रोहित व रक्षिता या दोघांना वाटतोय.

ड्रिम फाऊंडेशन कडुन दखल -

सामाजीक कार्याला नेहमीच मदत करणार्या येथिल ड्रिम फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. अनुराधा देशमुख यांना या कामाची माहिती समजल्यावर त्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी जावुन रोहित व रक्षिता या बहिण भावाची भेट घेवुन त्यांचे याबद्दल विषेश कौतुक करुन त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या शैक्षणीक खर्चाची जबाबदारी स्विकारली आहे.

गोंदवले खुर्द चा माळरान हिरवळीने नटावा हिच माझी ईच्छा - रोहित बनसोडे, गोंदवले खुर्द.

गत वर्षी माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धचीे ज्या गावात कामे झाली आहेत ती गावे पाणीदार बनली आहेत त्यामुळे मला माझ्या गावातील डोंगरावर हिरवळ आणावयाची असल्यानेच आपण हे काम करीत आहे.

दादाला मदत व्हावी व गावाला याचा फायदा व्हावा म्हणुनच - रक्षिता बनसोडे, गोंदवले खुर्द आमच्या गावाने जरी या स्पर्धेत सहभाग घेतला नसला तरी गावाला याचा फायदा होईल याच उद्देशाने माझ्या भावाने सुरु केलेल्या या कामाला माझीही मदत व्हावी यासाठी मी ही त्याच्यासोबत श्रमदान करीत आहे.

मुला मुलीचा अभिमान वाटतो - शंकर बनसोडे, गोंदवले

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया सुरु असुन सुट्टया म्हटले की मुलांच्या मौज मजेचे दिवस मात्र ही सुट्टी मौज मजेत न घालवता माझ्या मुलांनी केलेले हे सामाजीक काम पाहुन मला त्यांचा बाप असल्याचा अभिमान वाटतो, कोणी त्यांचे करो अथवा न करो मला
मात्र त्यांचे फार कौतुक वाटते. 

रोहित व रक्षिता चा आदर्श तरुणांनी घ्यावा - अनुराधा देशमुख,  लोधवडे - अध्यक्षा ड्रिम फाऊंडेशन ) 
   
रोहित व रक्षिता या दोघांनी जे काम केले आहे ते करण्याचे खरेतर त्यांचे वय नाही या वयात त्यांच्या मनात आलेला सामाजीक विचार हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांचा आदर्श नवतरुणांनी घ्यावा. 


No comments

Powered by Blogger.