शिंगणापूर ग्रामपंचायतीस ISO मानांकन


राजुरी : शिंगणापूर ता. माण येथील ग्रामपंचायतीस नुकतेच ISO मानांकन मिळाले असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ग्रामपंचायतीवरती कौतुकाचीथाप टाकली आहे.

नुकतीच शंभू महादेव यात्रा नियोजन बैठक झाली या बैठकीत ग्रामपंचायतीस ISO मानांकन पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक माने, उपविभागीय अधिकारी काळे, माण पंचायत समितीचे सभापती पाटोळे, तहसीलदार सुरेखा माने, गट विकास अधिकारी चौगुले, फलटण तहसीलदार विजय पाटील, शिंगणापूरचे सरपंच अभय मेनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे , ग्रामविकासअधिकारी रमेश साळुंखे, सदस्य हनुमंत भोसले आदींसहमान्यवर मंडळी उपस्थित होती.

शिंगणापूर ग्रामपंचायतीच्यावतीने नाविन्य पूर्ण उपक्रम,झिरो पेंडसी , घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत गांडूळखत प्रकल्प, सुशोभीकरण, लेखासहिता 2011 प्रमाणे 1 ते 33 ग्रामपंचायत नमुने ठेवणे , ग्रामपंचायत ISO मानांकन करणे, आपले सरकार सेवा केंद्र या सारखे उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ग्रामविकासअधिकारी रमेश साळुंखे यांच्या खांद्यावर कौतुकाची थाप मारली आहे.

No comments

Powered by Blogger.