Your Own Digital Platform

राज्यस्तरावर तयार केलेल्या टास्क फोर्सला 3 महिन्याची मुदत


सातारा : कोयना प्रकल्पग्रस्तांचे रखडलेल्या पुनर्वसनाचे प्रश्न पुढील वर्षापर्यंत कोणत्याही परस्थितीत सोडवायचे आहेत. यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर तयार केलेल्या टास्क फोर्सला 3 महिन्याची मुदत दिली आहे. या टास्क फोर्सने दिलेल्या मुदतीत काम करून हे प्रश्न सोडविण्यासाठी आपला अहवाल शासनाला सादर करावा, अशा सक्त सूचना पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज दिल्या. तर कोयनेच्या पोट खातेदाराला खातेदाराचा दर्जा देण्यात येणार नसून शासनाने टास्क फोर्सला कोयनेचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या मुदतीतच काम पूर्ण करणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोयना पुनर्वसनासाठी निर्माण केलेल्या टास्क फोर्सचा आढावा पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी घेवुन जिल्हाधिकारी यांच्या दालनांत आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल ,अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड , पुनर्वसनधिकारी आरती भोसले यांच्या सह सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पाचे धरणग्रस्त उपस्थित होते.

ना.माधव भंडारी पुढे म्हणाले की जिल्हा प्रशासनाने व टास्क फोर्सने नुसता कोयना धरण या विषयासाठी काम न करता कोयना अभयारण्य ,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सध्याचे ज्वलत विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.या विषयाकडे दुर्लक्ष करू नये.

यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोयनेच्या प्रकल्पग्रस्ताचे संकलनाचे काम सध्या युध्दपातळीवर प्रशासना कडून सुरू आहे.मूळ व पात्र खातेदाराचे संकलनाची माहिती गोळा झाल्यानंतर त्या॑ना पर्यायी जमीन वाटप करण्यात येणार आहे.पर्यायी जमीन वाटपासाठी जमीन किती उपलब्ध आहे याचा तपशील घेण्यात येत आसल्याचे यावेळी सांगितले.

पर्यायी जमीन वाटपात कोणी वंचित राहू नये याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे,त्यासाठी जाहिरात , ठिकठिकाणी कॅम्प लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. कोयनेचा प्रश्न हातावेगळा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.