Your Own Digital Platform

मान्सूनचे तालुक्यात दमदार आगमन


स्थैर्य, फलटण : मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर दोन दिवसातच मान्सूनचे फलटण तालुक्यात दमदार आगमन झाले आहे. काल संपूर्ण तालुक्यामध्ये सायंकाळपासून पावसाने चांगलाच बरसू लागला आहे.

 फलटणच्या पश्‍चिम भागत सायंकाळी 5 वाजल्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली. इतर भागात सायंकाळी 6 नंतर पावसाने हजेरी लावली. येत्या 24 तासांत मान्सूनचा पाऊसाची तिवार्ता वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि मुंबईतही मान्सूनच्या सरींनी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. आता मान्सूनच्या आगमनाने लोकांना दिलासा मिळाला आहे. 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस म्हणजेच 9 आणि 10 जून रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. 8 ते 12 जून या पाचही दिवशी मच्छीमारांना कोकण आणि गोवा किनारपट्टीवर अरबी समुद्रात मध्य पूर्वेकडे न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. 

मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक, गोव्याहून पुढे सरकत आज मान्सूनने महाराष्ट्राचा दक्षिण भाग व्यापला आहे. येथून पुढे मान्सून तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून पुढे सरकत राहील. शुक्रवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवार, 9 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 10 व 11 जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.