पळशी येथील हनुमान विद्यालयाचा निकाल 98 टक्के


म्हसवड : पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच गाव म्हणून ओळख असणाऱ्यां माण तालुक्यातील पळशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालयाने दहावीच्या उज्वल निकालाची परंपरा ह्या वर्षीही राखुन ठेवली असुन या विद्यालयाचा निकाल 98.01 लागला असुन गुणवंत विद्यार्थ्यां मध्ये मुलींनी बाजी मारली आहे .

श्री हनुमान विद्यालयाच्या या निकालात मुलींनी बाजी मारली असून प्रथम क्रमांक कु.अनुराधा विजय मोहिते 90.20 % , व्दितीय क्रमांक श्रेयश पोपट खाडे 89.40 % तर तृतीय क्रमांक कु.कोमल दादासो ठोंबरे 88.40 % तर या बरोबर कु.प्रतिक्षा देवकुळे 81.80 % , कु. प्रियंका खाडे 88.00 % कु.रौशनी टकले 87.60 %, कु.सायली खाडे 85.40 % , कु.मयुरी चिंचकर 85.80 % या सर्व विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे, या विद्यालयाने नेहमीच निकालात बाजी मारली आहे .

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका रेहाना नायकवडी ,आबासाहेब राजगे ,सुनिल लादे ,मुकुंद रोकडे , बालाजी खाडे , शिंगाडे सर ,बापू काळे , अमोल काशीद यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यां शिक्षकांचे केशवराव वणवे , जिल्हा नियोजनचे सदस्य बाळासाहेब खाडे , लक्ष्मण माळवे ,डाॅ.राजेंद्र खाडे , सरपंच शंकर देवकुळे , चेअरमन महादेव खाडे ,उपसरपंच शंकर गंबरे , आयडियल ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण नागरगोजे , विशाल नाकाडे व स्कुल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले .

No comments

Powered by Blogger.