अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा : सौ रेश्मा देशमुख


जावली : १७ वर्षे अखंडपणे राज्यकारभार करणार्या अहिल्यादेवी या संपुर्ण जगातील पहिल्या उत्कृष्ट  महिला प्रशासक होत्या त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन कार्य करावे आसे प्रतिपादन कोळकी ता फलटण येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सौ रेश्मा देशमुख यांनी केले.

 जावली ता फलटण येथिल अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती च्या प्रसंगी सौ रेश्मा देशुमुख बोलत होत्या  सरपंच काशिनाथ शेवते युवा व्याख्याते नवनाथ कोलवडकर    फलटण तालुक ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष निलेश सोनवलकर पै संजय देशमुख पत्रकार सुभाषराव सोनवलकर चेअरमन आप्पासो गोफणे तंटामुक्ती अध्यक्ष मायाप्पा पोकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी इयत्ता बारावी मधील गुणवंत विद्यार्थी जावली गावातील सेवनिवृत्त कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनिस राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परिक्षा यशस्वी विद्यार्थी आदींचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात आला.

 व्याख्याते नवनाथ कोलवकर यांनी आपल्या शैलीदार विविध प्रकारच्या आवाजावरून आणि वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजाचे विनोदी शैलीत साधरीकरण केले लोकांनी याला जोरदार प्रतिसाद दिला.

 यावेळी अशोक आढाव सरपंच काशिनाथ शेवते सुभाषराव सोनवलकर निलेश सोनवलकर नवनाथ कोलवकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल पडर यांनी स्वागत व सुत्रसंचलन केले राजकुमार गोफणे यांनी प्रस्ताविक तर नितीन गोफणे यांनीआभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळाभाऊ मकर सुनिल गोफणे विजय पडर रामदास पोकळे गणेश मकर आदींनी विशेष परिश्रम घेतल यावेळी कार्यक्रमास लखन शेंडगे धनाजी नाळे बाळासाहेब पोकळे विलास चवरे शिवाजी मोरे सुरेश बाबर सय्यद शेख आबासाहेब चवरे  रावसाहेब निंबाळकर विलास बनकर सुभाष नाळे आदीसह  मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.