आधार संस्थेचे कार्य आदर्शवत- निवृत्ती पवारपाटण : आपण माणुस आहोत आणि समाजाच काही देणे लागतो ही जाणीव जीवन समृद्ध करायला मदत करते.स्वार्थाविना सेवाभाव या ब्रीद वाक्याला अनुसरुन संस्थेचे कार्य सुरू आहे .संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवुन आपल्या कार्याचा ठसा उमठवला आहे .संस्थेने राबवलेले हे उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी व आदर्श वत आहेत असे प्रतिपादन माजी प्राचार्य निवृत्ती पवार यांनी केले.

आधार जनसेवा सामाजिक संस्था व नवी मुंबई युवा संस्था नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाटण येथील कातकरी वस्तीतील मुलांना कपडे व महिलांना साडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की, समाजातील अनेक समाज बांधव मुलभुत गरजा ,सुविधा व विकासापासुन दुर आहेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही सर्वांची जबाबदारी आहे.मुंबई स्थित नेरुळ येथील नवी मुंबई युवा संस्थेचे अध्यक्ष अमर पाटील,व तकोजा विभाग अध्यक्ष प्रशांत गायकर यांच्या प्रेरणेने तसेच निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित घटकांसाठी संस्थेने सुरु केलेले कार्य कौतुकास्पद आहे .

सोमनाथ आग्रे यांनी प्रास्तविक व स्वागत केले.शेखर धामणकर यांनी आभार मानले.

यावेळी सुनिल क्षिरसागर,इकबाल हकीम,सतिश देसाई ,राजेंद्र पवार,विश्राम दरडे,गणेश बीचकर,प्रसाद वळसंग,कन्हैया घोणे,सोमनाथ जंगम,स्वप्निल नेवरेकर,ऋत्विक भोपळे,आनंद पावस्कर,गोपाल शिंदे ,उत्तम भिसे,वसंत कदम उपस्थित होते .

No comments

Powered by Blogger.